E Shram Card Yojana ई-श्रम कार्ड योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना असून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी ती एक मोठी आर्थिक मदत ठरत आहे. देशातील कोट्यवधी कामगारांना या योजनेच्या माध्यमातून दरमहा ₹3,000 पेन्शनचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना ई-श्रम पोर्टलवर किंवा नजीकच्या CSC सेंटरमध्ये जाऊन अर्ज करता येतो.
काय आहे ई-श्रम कार्ड योजना?
१५ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा उद्देश देशभरातील असंघटित क्षेत्रातील मजुरांची नोंदणी करून त्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा देणे हा आहे. या योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना ६० वर्षांनंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळेल. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
या योजनेचे फायदे कोणते आहेत?
ई-श्रम कार्डसह लाभार्थ्यांना विविध फायदे मिळतात. कार्ड संपूर्ण भारतभर वैध आहे आणि सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळण्यास मदत होते. अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ₹2 लाख, अंशतः अपंगत्व आल्यास ₹1 लाख, तर कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास ₹2 लाखांची आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय, वयाच्या ६० नंतर दरमहा ₹3,000 पेन्शन स्वरूपात मिळते. ही पेन्शन पती-पत्नी दोघांनाही मिळू शकते, जर ते दोघंही पात्र असतील.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
ई-श्रम कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि बँक खात्याचे तपशील आवश्यक असतात. या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी पूर्ण केली जाते आणि कार्ड जारी केले जाते.
ई-श्रम कार्डसाठी अर्ज कसा कराल?
जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल, तर eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तेथे ‘Register on eShram’ या पर्यायावर क्लिक करा. आधार लिंक असलेला मोबाईल नंबर टाका, OTP भरून पुढील स्टेप पूर्ण करा. तुमचा आधार नंबर, वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. अर्ज पूर्ण झाल्यावर ई-श्रम कार्ड डाउनलोड करून प्रिंट काढू शकता.
जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल, तर जवळच्या CSC (Common Service Center) वर जाऊन नोंदणी प्रक्रिया पार पाडता येते. तेथे आवश्यक कागदपत्रे द्या आणि नोंदणी केल्यानंतर पावती मिळते.
Disclaimer: वरील माहिती सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइट किंवा स्थानिक CSC सेंटरमध्ये तपशीलवार माहिती घ्या. शासन निर्णयात बदल होऊ शकतो.