Ladki Bahin Yojana ज्या घरांचं वार्षिक उत्पन्न हे ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत आता एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे.
या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला ₹1500 जमा केले जातात. गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र, अलीकडेच योजनेच्या निकषात बसत नसलेल्या महिलांची नावं हटवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्टपणे दिली आहे.
भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ म्हणाले, “या योजनेचा उद्देश गरिब महिलांना मदत करणे आहे. ज्या महिलांकडे गाड्या, बंगले, मोठे आर्थिक स्रोत आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही.” त्यांनी यापूर्वीही स्पष्ट केले होते की, अशा महिलांनी स्वतःहून पुढे येऊन नाव मागे घ्यावं, कारण ही योजना गरिबांसाठी आहे, श्रीमंतांसाठी नाही.
भुजबळ पुढे म्हणाले, “जर एखादी महिला निकषात बसत नाही आणि तरीही लाभ घेत असेल, तर ते चुकीचं आहे. अशा प्रकरणांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. सरकार अशा महिलांविरोधात कठोर भूमिका घेण्याऐवजी, त्यांनी स्वेच्छेने योजनेतून माघार घ्यावी,” असं आवाहन त्यांनी केलं.
हनी ट्रॅप प्रकरणावरही भुजबळांचं स्पष्टीकरण
राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावर देखील भुजबळ यांनी मत व्यक्त केलं आहे. “मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की हनी आणि ट्रॅप असं काही नाही. जर कोणाकडे सीडी किंवा तत्सम पुरावे असतील, तर ते पोलिसांकडे द्यावेत. पोलिस योग्य ती चौकशी करतील,” असं ते म्हणाले. याप्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार बदल सीडीमुळे झाल्याचा आरोप केला होता, त्यावर भुजबळ म्हणाले, “मी त्या मताशी सहमत नाही.”
Disclaimer: EduLandSchool.in वरील माहिती शासकीय वेबसाईट्स, अधिकृत मंत्र्यांचे निवेदने, आणि बातमी स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. ही माहिती फक्त जनहितासाठी असून, योजनेसंदर्भात अचूक माहितीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. लाडकी बहीण योजनेत कोण पात्र आहे?
ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्या पात्र आहेत.
2. योजनेअंतर्गत किती रक्कम मिळते?
दर महिन्याला ₹1500 थेट बँक खात्यात जमा केली जाते.
3. नाव वगळण्याची प्रक्रिया का सुरू झाली?
निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.
4. जर नाव चुकीने वगळलं गेलं असेल तर काय करावं?
संबंधित तहसील कार्यालय किंवा महाDBT पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
5. लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट कुठे मिळेल?
राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइट्स, महाDBT पोर्टल आणि स्थानिक बातम्यांमधून.