Nuksan Bharpai GR फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात अनेक भागांत अवकाळी पावसाने आणि गारपीटीने थैमान घातलं. परिणामी, विविध जिल्ह्यांतील शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपयांच्या अनुदानाला मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक आधार मिळणार आहे.
या मदतीत ३४ जिल्ह्यांतील ३ लाख ९८ हजार ६०३ शेतकरी लाभार्थी असतील. छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे.
विभागनिहाय नुकसान भरपाईचे आकडे:
नागपूर विभागातील: ५०,१९४ शेतकऱ्यांसाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपयांचा निधी.
अमरावती विभागातील: ५४,७२९ शेतकऱ्यांसाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार रुपयांची मंजुरी.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील: ६७,४६२ शेतकऱ्यांना ५९ कोटी ९८ लाख २० हजार रुपयांचे अनुदान.
पुणे विभागातील: १,०७,४६३ बाधित शेतकऱ्यांसाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार रुपयांचा निधी.
कोकण विभागातील: १३,६०८ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांची मदत.
नाशिक विभागातील: १,०५,१४७ शेतकऱ्यांना ८५ कोटी ६७ लाख ८ हजार रुपयांचे अनुदान मंजूर.
राज्य सरकार विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी ‘निविष्ठा अनुदान’ देत असते. परंतु यंदा हे अनुदान २७ मार्च २०२३ च्या जुन्या शासन निर्णयानुसार दिलं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भरपाई मिळणार नसल्याने नाराजीचं वातावरण आहे.
अनुदान कसे मिळेल?
शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट अनुदान जमा करण्यात येईल. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांनी KYC (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. केवायसी न केल्यास अनुदान थांबण्याची शक्यता आहे.
Disclaimer: वरील माहिती ही अधिकृत शासन आदेशावर आधारित असून यामध्ये स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार बदल होऊ शकतो. अनुदानास पात्रतेसाठी संबंधित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा लेखक याची कुठलीही जबाबदारी घेत नाही.
FAQs: नेहमी विचारले जाणारे प्रश्न
1. कोणत्या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी हे अनुदान आहे?
फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी.
2. हे अनुदान किती जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे?
राज्यातील एकूण ३४ जिल्ह्यांतील ३.९८ लाख शेतकऱ्यांना.
3. अनुदान थेट खात्यावर कसे जमा होईल?
DBT प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होईल.
4. शेतकऱ्यांनी काय करणे आवश्यक आहे?
अनुदानासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
5. शेतकऱ्यांना जुन्या दराने अनुदान का दिलं जात आहे?
राज्य सरकारने २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार जुन्याच दराने निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.