Personal Loan Gramin Bank अचानक पैशांची गरज भासली तर काय कराल? लग्न, शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा घराची दुरुस्ती अशा प्रसंगी पैशांची कमतरता भासू शकते. अशा वेळी महाराष्ट्र ग्रामीण बँक आपल्या पात्र ग्राहकांना मोठा दिलासा देत आहे. बँकेकडून आता २० लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) सहज मिळू शकते.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये
हे कर्ज आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते. कर्जाची रक्कम किमान ₹५०,००० पासून ते कमाल ₹२०,००,००० पर्यंत मिळू शकते. कर्जाचा कालावधी १२ महिन्यांपासून ६० महिन्यांपर्यंत ठेवता येतो.
व्याजदर साधारणतः १०.५०% ते १३.५०% दरम्यान असतो आणि तो तुमच्या क्रेडिट स्कोअरनुसार ठरतो. हे कर्ज अनसिक्योर्ड लोन असल्याने कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही.