Punjab Dakh Andaj खरिप हंगामाला पूरक असं हवामान अखेर राज्यभर सक्रिय झालं असून, बऱ्याच भागांमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र आता हवामान विभागाने आणि प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 24 ते 27 जुलै 2025 या कालावधीत राज्यभर पावसाची शक्यता वर्तवली आहे. या चार दिवसांमध्ये काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. शेतकरी बांधवांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आजपासून पावसाचा जोर
24 जुलैपासून पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, हिंगोली, बुलढाणा, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. काही भागांत मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे वाहू शकतात, जमिनीत पाणी साचण्याची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा
पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वाशिम येथे दररोज वेगवेगळ्या भागांत पाऊस होणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात धर्माबाद, बिलोली, मुदखेड या भागांत आता पावसाला सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अंदाज
परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये 27 जुलैपर्यंत पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी पुरस्थितीही निर्माण होऊ शकते. विशेषतः परभणीमध्ये आणि लातूर-धाराशिव भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
उघडीप नंतर सूर्यदर्शन
28 जुलैनंतर राज्यभर पावसाचा जोर कमी होणार असून, 29 जुलैपासून सूर्यदर्शन होईल, असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा पाऊस परतण्याची शक्यता असून, त्यावेळीही राज्यभर चांगला पाऊस अपेक्षित आहे.
Disclaimer: वरील माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या सोशल अपडेट्सवर आधारित आहे. शेवटचा निर्णय आणि अचूक हवामान अंदाजासाठी अधिकृत हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या. शेती निर्णय घेताना स्थानिक हवामान परिस्थिती आणि कृषी सल्ल्याचा आधार घ्या.
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. सध्या कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे?
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 24 ते 27 जुलैदरम्यान पावसाची शक्यता आहे.
2. पाऊस कोणत्या स्वरूपाचा असेल?
कुठे मध्यम, कुठे जोरदार तर कुठे अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे.
3. पावसामुळे खरिपातील पिकांवर काय परिणाम होईल?
हा पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरणार असून, उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
4. पुढील पावसाचा कालावधी कधी आहे?
डख यांच्या अंदाजानुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे.
5. पावसाचा जोर कधी कमी होईल?
28 जुलयानंतर राज्यात पावसाचा जोर ओसरेल आणि 29 जुलयानंतर बऱ्याच भागात सूर्यदर्शन होईल.