Sonyache Aajche Dar गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढलेले सोने आता स्वस्त झाले आहे. जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) पासून घरगुती बाजारापर्यंत सोने दरात मोठी घट झाली आहे. मागील आठवड्यात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात जवळपास १९०० रुपयांची घसरण नोंदली गेली आहे.
एमसीएक्सवरील सोन्याचा ताजा दर
MCX वरील ३ ऑक्टोबरला एक्सपायरी असलेल्या गोल्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये आठवडाभरात मोठी घसरण दिसली. जरी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी थोडी वाढ झाली असली तरी एकंदरित घसरणीचा कल कायम राहिला. ८ ऑगस्ट रोजी ९९९ शुद्धतेचं १० ग्रॅम सोनं १,०१,७९८ रुपये होतं, ते शुक्रवारी कमी होऊन ९९,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं. म्हणजेच केवळ चार दिवसांत सोन्याचा दर जवळपास १९४८ रुपयांनी घसरला.
घरगुती बाजारातही घसरण
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, ८ ऑगस्टला सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर १,०१,४०६ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो संध्याकाळी कमी होऊन १,००,९४२ रुपये झाला. पुढील काही दिवसांत ही घसरण सुरूच राहिली आणि मागील शुक्रवारी हा दर आणखी घसरून १,००,०२३ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत आला. म्हणजेच घरगुती बाजारात ९१९ रुपयांची घट झाली. मात्र मागणी कायम असल्याने भाव अजूनही १ लाखाच्या आसपास टिकून आहे.
वेगवेगळ्या कॅरेट सोन्याचे दर
२४ कॅरेट सोनं – १,००,०२३ रुपये प्रति १० ग्रॅम
२२ कॅरेट सोनं – ९७,६२० रुपये प्रति १० ग्रॅम
२० कॅरेट सोनं – ८९,०२० रुपये प्रति १० ग्रॅम
१८ कॅरेट सोनं – ८१,०२० रुपये प्रति १० ग्रॅम
१४ कॅरेट सोनं – ६४,५१० रुपये प्रति १० ग्रॅम
IBJA द्वारे जाहीर केलेले दर देशभरात समान असतात. मात्र वेगवेगळ्या राज्यात ३ टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्ज लागू झाल्यानंतर दर बदलतात. प्रत्येक ज्वेलरी दुकानाचे मेकिंग चार्ज वेगळे असल्यामुळे अंतिम किंमतीत फरक पडतो.